Surely You Are Joking Mr. Finemen By Richard Fineman(Author),Madhuri Shanbag(Translators)
Surely You Are Joking Mr. Finemen By Richard Fineman(Author),Madhuri Shanbag(Translators)
Couldn't load pickup availability
रिचर्ड फाईनगन (१९१८-१९८८)
नोबेल पुरस्कार विजेते फिजिक्स संशोधक, जे नीतीनियम गुंडाळून वेगवेगळ्या विषयांत साहसे करत जोमाने विस्तारत गेले. या पुस्तकात आपल्या खास शैलीदार भाषेत ते आपले अनुभव मांडतात. त्यात ते 'आईनस्टाईन' आणि 'बोहर' यांच्याशी फिजिक्सच्या कल्पनांवर चर्चा करतात, तर जुगार कसा खेळावा यावर 'निक द ग्रीक' याच्याशी कल्पनांची देवघेव करतात. अणुबॉम्बच्या गुप्त कागदपत्रांचे संरक्षण करत असलेल्या अति सुरक्षित तिजोऱ्या उघडतात आणि बॅले नृत्यासाठी उत्कृष्ट साथ करणारे ढोलवादन करतात. बैलाशी झुंज घेणाऱ्या नग्न स्त्रीचे चित्र काढतात. भुवया उंचवाव्यात अशी अनेक स्वभाव-वैशिष्ट्ये या आत्मकथनातून प्रत्ययाला येतात. थोडक्यात सांगायचे तर फाईनमन यांच्या जीवनाची सारी विक्षिप्त, वैभवी वाटचाल म्हणजे एक प्रकांड बुद्धीमत्ता, असीम कुतूहल आणि अदम्य आत्मविश्वास यांचे ज्वालाग्रही मिश्रण आहे.
Share
