Due Courier Holiday Orders with Ship after 5th Nov , Free shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे ‘स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते. विषयाचे पर्यावरण, उद्योगकल्पना ते यशस्वी स्टार्टअपची प्रथम समभाग विक्री या प्रवासाची प्रत्येक पायरी, प्रत्येक अंग यांच्या मांडणीत हे पुस्तक परिपूर्ण आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. सरदेशमुख यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये स्टार्टअपशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह अगदी साध्या-सोप्या भाषेत केला असून उद्योजकतेशी संबंधित सर्वांना ते अतिशय मोलाचे व मार्गदर्शक ठरेल. डॉ. नितीन करमळकर, शिक्षणतज्ज्ञ महाराष्ट्रातील व इतरत्र मराठीत रस असलेल्यांकरिता त्यांना भावेल अशा भाषेत उद्योगातील एका अनुभवी व्यावसायिकाने अगदी योग्य वेळी हे पुस्तक लिहिले आहे. त्याद्वारे उद्योजकतेतील यशाचे प्रमाण वाढीला लागेल... डॉ. गणेश नटराजन, उद्योगपती, मेंटॉर, गुंतवणूकदार
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books