Srujansheel Pesheechakra By Dr.Suniti Dharwadkar (सृजनशील पेशीचक्र)
Srujansheel Pesheechakra By Dr.Suniti Dharwadkar (सृजनशील पेशीचक्र)
Couldn't load pickup availability
आरोग्यपूर्ण जीवनपद्धतीमध्ये व्यायाम, आहार-विहार, मनशांती, सकारात्मक विचार पद्धती, सौहार्दपूर्ण सामाजिक वातावरण अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. या पुस्तकातून निरामय जीवनशैली आणि सकारात्मक जैविक क्रिया यांच्या सहसंबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पेशींमध्ये घडणाऱ्या जैविक क्रिया या उत्पत्ती लय या चक्राशी जोडलेल्या असतात. म्हणूनच आरोग्यभानाचे विज्ञान समजून घेण्यासाठी शरीरातील उत्पत्ती - लय या पेशीचक्राचा अंतर्वेध इथे घेतला आहे. निरुपयोगी पेशींची 'पानगळ' शरीराची 'सृजनशीलता' कशी जपते हे जाणून घेण्यासाठी हा अंतर्वेध उपयोगी ठरेल.
पेशींच्या अंतरंगात चालू असणाऱ्या जीवरासायनिक घडामोडी आपल्या आरोग्यावर परिणाम करीत असतात. त्यांच्या असमतोलामुळे प्रदाह, रोगग्रस्त वृद्धत्व व कर्करोग यांसारखे बिघाड उद्भवतात. त्यांना टाळून निरामयता टिकून ठेवण्यामध्ये पर्यावरणाच्या संबंधित एपीजेनिक घटकांची महत्त्वाची भूमिका असते. एपीजेनिक घटक हे जीनोमचे म्हणजे जनुकांच्या कार्याचे नियंत्रण करतात. अर्थात या सर्व जीवरासायनिक घडामोडी आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. म्हणूनच निरामय आरोग्याची वाटचाल करण्यासाठी यामागचे जीवविज्ञान समजून घेणं हे महत्त्वाचे ठरते. त्याचसाठी 'सृजनशील पेशीचक्र' हे पुस्तक आपल्या हाती सोपवत आहोत.
Share
