Sprititual Book By Ritesh Vedpathak (२ पुस्तकांचा संच- नामाच्या पाठीमागे, साधक स्वामींचा)
Sprititual Book By Ritesh Vedpathak (२ पुस्तकांचा संच- नामाच्या पाठीमागे, साधक स्वामींचा)
नामाच्या पाठीमागे
प्रपंचामधील साधना व प्रपंच या संभ्रमात असलेल्या साधकांसाठी सर्व प्रश्नांची उत्तरे "साधक स्वामींचा" पुस्तकाचे लेखक श्री रितेश वेदपाठक यांनी "नामाच्या पाठिमागे" या पुस्तकात दिली आहेत.
"नामाच्या पाठिमागे" या पुस्तकातून काय मिळेल आम्हाला महाराजांचं दर्शन कसे होईल? कामापूरते साधना करणे योग्य आहे का? आत्मज्ञान म्हणजे नेमके काय? नाम व ध्यान करताना येणारे विचार बंद कसे होतील? सहज समाधी कशी प्राप्त करावी?
साधक स्वामींचा
दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेले असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मला तरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा ‘गिरनार’ ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला आणि आजही पुरवत आहेत. बरीच मंडळी मागे लागतात की, ‘आम्हालासुद्धा तुमच्या सोबत घ्या’, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही. अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्वकष्टाच्या साधनेने. उगाच ओढून-ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्त्वाची. नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही. भले भले संत-महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते. मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जातो. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही,