Spardha Kalashi By Sharad Pawar, Abhay Tilak(Translators) (स्पर्धा काळाशी)
Spardha Kalashi By Sharad Pawar, Abhay Tilak(Translators) (स्पर्धा काळाशी)
आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग