Soyare Vanchare By Anil khaire (सोयरे वनचरे)
Soyare Vanchare By Anil khaire (सोयरे वनचरे)
Couldn't load pickup availability
अनिल खैरे म्हणजे प्राण्यांच्या सहवासात रमलेला माणूस.
खैरे यांना तरुण वयातच प्राण्या-पक्ष्यांनी, विशेषतः सापांनी भुरळ घातली. त्यांचं हे प्राणिप्रेम केवळ हौसेपुरतं मर्यादित राहिलं नाही. या प्रेमाखातर त्यांनी आयुष्यात नाना उद्योग केले. सर्पोद्यानाच्या उभारणीत योगदान दिलं. प्राण्यांचं अनाथालय सुरू करण्यात हातभार लावला. एवढंच नव्हे, तर एका प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीचं शिवधनुष्यही पेललं.
परदेशात प्रशिक्षण घेऊन खैरे यांनी शून्यातून हे प्राणिसंग्रहालय उभं केलं आणि तब्बल दोन तप एखाद्या प्रेमळ कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सांभाळलं. बिबट्या, अस्वल, माकडं, मगर, साप अशा नाना प्राण्यांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावला. या प्राणिसंग्रहालयामुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. प्राण्यांच्या गोतावळ्याने व्यापून गेलं.
या मुक्या जीवांसोबत वावरताना आलेल्या धमाल अनुभवांची, प्राण्यांसोबतच्या निखळ नात्याची ही गोष्ट.
Share
