Sinhastha ( सिंहस्थ )
Sinhastha ( सिंहस्थ )
Couldn't load pickup availability
Sinhastha ( सिंहस्थ )
लेखक: डॉ. संपत देवगिरे
सिंहस्थ हा केवळ बारा वर्षांनी येणारा एक धार्मिक सोहळा नाही. तो भारतीय समाजमनाच्या दीर्घ स्मृतीचा, श्रद्धेचा, परंपरेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा एक विराट आविष्कार आहे. लाखो-करोडो लोकांना एका अदृश्य आध्यात्मिक धाग्याने एकत्र आणणारा हा उत्सव जितका धार्मिक आहे; तितकाच तो ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. गोदावरीच्या तीरावर नाशिकमध्ये भरत असलेला सिंहस्थ तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक विलक्षण पर्व आहे.सिंहस्थ नेमका केव्हा आणि कसा सुरू झाला? त्यामागील पौराणिक कथा कोणत्या आहेत? कुंभमेळ्याच्या परंपरेला ऐतिहासिक आधार कितपत आहे? नाशिकच्या सिंहस्थाला ‘सिंहस्थ’ हे नाव कसे प्राप्त झाले? त्याचे हिंदू धर्मातील स्थान काय आहे? शैव, वैष्णव आणि विविध संप्रदायांच्या आखाड्यांची निर्मिती कशी झाली? त्यांच्या परंपरा, मानमरातब, मिरवणुका आणि धार्मिक अधिकारांची रचना कशी विकसित झाली?या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वरिष्ठ पत्रकार व संशोधक डॉ. संपत देवगिरे यांनी या पुस्तकातून केला आहे.
Share
