Sijhar Shavejh By Kisan Chopade (सिझर शॅवेझ)
Sijhar Shavejh By Kisan Chopade (सिझर शॅवेझ)
Couldn't load pickup availability
अमेरिकेतील शेतमजुरांची दुःखं वेशीवर टांगून, त्यांच्या हितासाठी काही तरी करण्याचे स्वप्न बाळगणारा नेता. मेक्सिकन स्थलांतरितांना न्याय मिळावा यासाठी महात्मा गांधीजींचे विचार अमेरिकेसारख्या देशात व्यवहारात आणणारे सुधारक. ‘मेक्सिकन गांधी’ अशीच आपली ओळख निर्माण करणारे सिझर एस्ट्रेडा शॅवेझ यांची ही जीवनकहाणी.
स्थलांतरित अमेरिकन शेतमजूर, अमेरिकेतील शेती, शेतमजुरांची तिथे होणारी पिळवणूक हे महत्त्वाचे प्रश्न आहेत कॅलिफोर्निया टेक्सास अॅरिझोना यांसारख्या राज्यांत असणारे शोषितांचे प्रश्न का व कसे निर्माण झाले? त्यातून कोणकोणत्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या? हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सिझर शॅवेझ यांनी महात्मा गांधीजींचा अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग वापरून, केलेले यशस्वी प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक आहे. सिझर यांनी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरलेल्या अनोख्या मार्गामुळे हे चरित्र इतर पाश्चात्त्य चरित्रांच्या परंपरेत वेगळे, म्हणूनच वाचनीय आहे. सिझर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून भोगलेल्या यातनांतून त्यांच्यातील नेतृत्वगुणाला संधी मिळत गेली. त्यामुळेच स्थलांतरित मेक्सिकन शेतमजुरांच्या चळवळीला दिशा आणि स्पष्ट स्वरूप मिळत गेले. अमेरिकेतील शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतमजुरांची संघटना बांधणाऱ्या आणि शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतमालकांशी यशस्वी बोलणी करणाऱ्या या अमेरिकेतील पहिल्या नेत्याचे जीवन संघर्षाने व्यापलेले आहे. शेतमजुरांचा त्याग आणि त्यांच्या अनोख्या कार्याची ओळख त्यांनीच अमेरिकेला पहिल्यांदा करून दिली. शेतमजुरांच्या हितासाठी त्यांची पहिली युनियन स्थापन करणाऱ्या सिझर यांनी शेतमजुरांच्या जीवनात अनोखा चमत्कार घडवून आणला.
महात्मा गांधीजींच्या मार्गावरून त्यांनी केलेली वाटचाल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.
Share
