Shrimad Bhagavatatil Bharat By Dr. Vidyasagar Patanganakar (श्रीमद् भागवतातील भारत)
Shrimad Bhagavatatil Bharat By Dr. Vidyasagar Patanganakar (श्रीमद् भागवतातील भारत)
Couldn't load pickup availability
‘श्रीमद् भागवतातील भारत’ या ग्रंथाचे लेखक विद्यासागर पाटंगणकर यांनी भागवतातील देशभक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले, ही अत्यंत अभिनंदनीय व स्तुत्य बाब होय, श्रीमद् भागवतातील ‘भारतवर्षा’चा शौथ घेताना व माहिती सांगताना लेखक केवळ भारताच्या भौगोलिक सीमा व तीर्थस्थळे यांच्यात न रमता भारतीय संस्कृतीचे ज्ञानात्मक व भावात्मक हृदय त्यांनी यात उलगडून दाखविले आहे. प्राचीन भारतीयांची जीवनदृष्टी, कालगणना, पर्यावरणविचार, वैज्ञानिक प्रगती, वर्णाश्रम धर्म, स्थापत्य विज्ञान, राष्ट्र विकास, समन्वयाचा संदेश, आध्यात्मिक उपदेश, कथारूपकांचा उलगडा, विश्वकल्याणाची आकांक्षा अशा अनेक विषयांचे सादर व सकस, पण सुलभ व प्रांजळ प्रतिपादन करून लेखकाने भारतीय संस्कृतीचे अंतर्बाह्य मनोज्ञ दर्शन घडवले आहे.
विस्तारभयास्तव या सर्व विषयांचे महत्त्व, स्पष्टीकरण व समीक्षा अशक्य व अनावश्यकच होय! मूळ ग्रंथाच्या वाचन-परिशीलनाने अभ्यासक व वाचक सुखावतील ! असा सुंदर ग्रंथोपहार मराठी सारस्वतास प्रदान केल्याबद्दल लेखक डॉ. विद्यासागर पाटंगणकर व विश्वकर्मा प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभकामना!
– आचार्य स्वामी गोविंददेव गिरि
(आशीर्वचनातून)
Share
