Shri Ramcharitmanas By Goswami Tulsidas | Geetgopal By G. D. Madgulkar
Shri Ramcharitmanas By Goswami Tulsidas | Geetgopal By G. D. Madgulkar
Couldn't load pickup availability
श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा.
पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥
असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें.
श्री. भा. द. खेर व श्री. वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं.
आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें.
श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार.
- ग. दि. माडगूळकर
नानापुराणनिगमागमसंमतं यद्रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि । स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबंधमतिमंजुलमातनोति ।
संतचरित्रकार नाभाजीने गोस्वामी तुलसीदासांना प्रत्यक्ष वाल्मीकीचाच अवतार मानलेले आहे. तुलसीदासांच्या सर्व ग्रंथांत 'रामचरितमानस' हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. रामायणाचे अवतार अनेक झाले. परंतु तुलसीरामायणाला तोड नाही. केवळ धार्मिक वाङ्मयालाच नव्हे, तर भारतीय साहित्यसृष्टीलाही तुलसीदासांचे 'रामचरितमानस' भूषणभूत होऊन राहिलेले आहे.
अंजनेयापरी भक्त। लेखनीं अपर वाल्मीकि । गोस्वामी तुलसीदासां । वंदनें लक्ष लक्ष हीं।
गोस्वामीजींच्या 'रामचरितमानसा ची सार्थ भाषांतरे अनेक उपलब्ध आहेत. माझा अनुवाद त्या सर्वापेक्षा वेगळा वाटावा; सोपा, सरळ आणि सुटसुटीत उरावा, अशी अपेक्षा आहे. गोस्वामीजींची 'रामकथा' मराठीतील सामान्य वाचकालाही कळावी, एवढाच माझा सीमित हेतू.
या ग्रंथाने मराठी वाचकांना तुलसीदासांच्या रामायणाचे छायादर्शन झाल्याचा आनंद मिळाला, तरी पुरे आहे.
- ग. दि. माडगूळकर
Share
