Skip to product information
1 of 1

Shri Madhusudan Saraswati Krut Bhaktirasayan By Dr. Jyotsna Patankar

Shri Madhusudan Saraswati Krut Bhaktirasayan By Dr. Jyotsna Patankar

Regular price Rs. 102.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 102.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

रस + आयन म्हणजे रसायन. ह्याचा अर्थ रसाकडे येणारे, रसाकडे झेपावणारे असा आहे. भक्तिरसाकडे झेपावणारे ते भक्तिरसायन असा अर्थ सुसंगत ठरण्यास हरकत नाही. श्रुती आत्मस्वरूपाला 'रसो वै सः' असे म्हणून तो आनंदरसात्मक आहे असे सांगते. 'शान्त' हाही एक रस मानला असून भगवन्ताशी ऐक्य साधलेली - विभक्त नसलेली भक्ती शान्तच असते.

भक्तिशास्त्र हे वेदान्तशास्त्राप्रमाणेच गंभीर व आशयघन आहे हे लेखिकेच्या लेखनातून सर्वत्र जाणवते. वेदान्ताच्या पायावर भक्तिशास्त्र उभे असल्याचे लक्षात येते. त्याच बरोबर काही पौराणिक वा भागवतादी ग्रंथातील संदर्भही भक्तिशास्त्राला पोषक ठरतात. उदा. ९-११ मध्ये पाल्यपालक भाव सांगतांना त्यात वात्सल्यरस असतो असे सांगून त्याची नंद-यशोदा इत्यादी उदाहरणे सांगितली आहेत. त्यामुळे ग्रंथ खुलतो.

संपूर्ण ग्रंथाच्या रचनेला संत श्रीदासगणू महाराजांचा आधार घेतल्याने एकप्रकारे हा ग्रंथ म्हणजे त्यांच्याच टीकेचा एक मनोज्ञ आविष्कार झाला आहे. टीकेच्या श्लोकांची भाषा जुनी असली तरी ग्रंथाची भाषा नवी असल्याने जुन्या सोन्याला झळाळी दिल्याचे समाधान मिळते. संपूर्ण ग्रंथाचे परिपूर्ण आकलन होऊन त्याची साधनारूप भक्तीत रूपांतर करण्यासाठी फार मोठी मदत मिळते. वाचकांनी ह्या ग्रंथाचे मनापासून स्वागत करावे ही प्रार्थना.

View full details