Shreemad-Bhagvadwitaa By R.R.Jambhekar(श्रीमद् भगवद्गीता-रा. रा. जाभेकर )
Shreemad-Bhagvadwitaa By R.R.Jambhekar(श्रीमद् भगवद्गीता-रा. रा. जाभेकर )
Couldn't load pickup availability
भगवद्गीता हैं दुःखमुक्तीचेंच शास्त्र आहे या दृष्टीने गीतेने सांगितलेले काहीं विचार अत्त्यंत अद्वितीय आहेत, ते असे-1) पृथ्वीवरील जीवन हैं दुःखे, विनाश व मृत्त्यू यांचेच जणू माहेर असतें, पण येथें तन्मलेला प्रत्येक मनुष्य हा मृत्त्यू व दुःखें नसलेलें स्थान कायमचें प्राप्त करून घेण्यासाठीं निघालेला त्या स्थानाचा पांथस्थ व हक्कदार असतो. गीतेने त्या स्थानालाच 'मोक्षस्थान' असें म्हटलें असून आमच्या अन्य धर्मग्रंथांनी त्या स्थानाला विष्णूलोक किंवा वैकुंठ असे म्हटले आहे. तें या विश्वांत प्रत्यक्ष कुठे तरी आहेच, यात तिळमात्र शंका नाही.2) प्रत्येक मनुष्य ईश्वराचाच अंश असतो. कळीचें फूल होणे जितकें निसर्गसहज असते, तितकेंच मनुष्याचें रुपांतर पूर्ण ईश्वरी स्वरूपांत होणे निसर्गसहज असतें. ३) गीतेतील श्रीकृष्णार्जुन संवाद इतका प्रत्यक्ष घडलेला आहे की त्यावेळी त्या संवादाचें झालेलें ध्वनीमुद्रण म्हणजेच जणं आजची छापील गीता होय, त्याचे गीतेतील पुरावेच लेखकाने या ग्रंथांत दिले आहेत. ४) गीताउपदेशांविषयीं आजही असलेले अनेक गैरसमज व प्रवाद, लेखकाने सप्रमाण खोडून काढले आहेत. ५) गीताज्ञान दुर्बोध तर मुळींच नाही, पण तें वाचकाला खिळवून ठेवील इतकें रंचक व ज्ञानदायी आहे. तें श्रद्धेय व विज्ञानसिद्ध असून कोणत्याही काळी अथवा स्थळी कालबाह्य होणारे नाही. पाने 641
Share
