Skip to product information
1 of 1

Shree Geetayog Shodh Bramhvidyecha By Balaji Tambe (श्री गीतायोग: शोध ब्रह्मविद्दोचा – बालाजी तांबे )

Shree Geetayog Shodh Bramhvidyecha By Balaji Tambe (श्री गीतायोग: शोध ब्रह्मविद्दोचा – बालाजी तांबे )

Regular price Rs. 161.50
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 161.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

पाच - साडेपाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून सदासर्वकाळ उपयोगी पडणारे सत्य सांगितले.

संत - साक्षात्कारी मंडळींनी, अभ्यासकांनी अनेक अनेकांनी श्रीमद्भगवद्गीतेवर चिंतन करूनही ते पूर्ण झाले नाही. काळानुसार तिच्यातील शब्दांचा, कल्पनांचा संदर्भ बदलतो आणि चिंतनातून नवीनच नवनीत हाती गवसते.

भारतीय संस्कृतीचा सखोल विचार करणारे गुरू डॉ. श्री बालाजी तांबे २१व्या शतकाचा संदर्भ ठेवून गीतेचा अर्थ उलगडायला लागतात, तेव्हा सध्याच्या स्पर्धात्मक, गतीमान आणि दगदगीच्या जीवनशैलीतही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत आणि मनःस्थितीत सुखशांती देणारी व अंतिम कल्याणाची विद्या देणारी 'ब्रह्मविद्या'च गुरू डॉ. श्री बालाजी तांबे गीतेच्या चिंतनातून आपल्याला समजावीत असतात. यात कुठेही अभिनिवेश नाही; उलट, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच दिलेल्या प्रेरणेमुळे आपल्याला गीता समजणे व आचरणात आणणे सोपे होऊ शकते, अशी त्यांची धारणा आहे.

गुरू डॉ. श्री बालाजी तांबे आपले गीतेसंबंधीचे चिंतन सध्याच्या जीवनपद्धतीला उपयोगी पडेल अशा रीतीने 'साम मराठी' वाहिनीवर 'श्री गीतायोग: शोध ब्रह्मविद्दोचा' या कार्यक्रमातून मांडत आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र निरूपण करणारे पुस्तक चर्चा चिंतनास, अभ्यासास प्रवृत्त करणारे ठरेल. दैनंदिन व्यवहारात

कर्म मार्गदर्शन करणारे ठरेल.

View full details