Skip to product information
1 of 5

Shivrayanche Eknishta Mavle Tanaji Malusare By Prashant Kulkarni - (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे- तानाजी मालुसरे )- New book

Shivrayanche Eknishta Mavle Tanaji Malusare By Prashant Kulkarni - (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे- तानाजी मालुसरे )- New book

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 120.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Book Type

‘तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते.  
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत  तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली.  युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.

View full details