Shivrayanche Eknishta Mavle - ( Gupter Bahirji Naik + Netoji Palkar + Tanaji Malusare+ Hambirrao Mohite) -( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - गुप्तहेर बहिर्जी नाईक + नेतोजी पालकर + तानाजी मालुसरे+ हंबीरराव मोहिते )
Shivrayanche Eknishta Mavle - ( Gupter Bahirji Naik + Netoji Palkar + Tanaji Malusare+ Hambirrao Mohite) -( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - गुप्तहेर बहिर्जी नाईक + नेतोजी पालकर + तानाजी मालुसरे+ हंबीरराव मोहिते )
Couldn't load pickup availability
गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते.
सदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.
नेतोजी पालकर | लेखक - प्रशांत कुलकर्णी
शिवरायांचे सरसेनापती नेतोजी पालकर हे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. अगदी लहानपणी सुलतानी राजवटीच्या अत्याचाराने पिडित असलेला त्यांचा परिवार कोकणातील चौक या गावी आला. सुलतानी संकटांशी दोन हात करुन आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे, या विचाराने त्यांनी तरुणांना एकत्र करुन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. पुढे ते गावचे पाटील झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यापासून ते होते. प्रथम किल्लेदार व नंतर नेतोजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले.
सरनौबत असताना अफजलखान प्रसंग असो अथवा थेट विजापूरची राजधानी, नेतोजींची झंझावत हे प्रसंगाने आदिलशाहची घाबरगुंडी उडाली होती. फाजलखानचा पराभव , उंबरखंडातील पराक्रम, सुरतेवरील आक्रमण या प्रसंगी नेतोजींचा चढता आलेख बघितला की, मन थक्क होते.
तानाजी मालुसरे | लेखक - प्रशांत कुलकर्णी
‘तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते.
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.
हंबीरराव मोहिते | लेखक - प्रशांत कुलकर्णी
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.!
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
Share
