Shivrayanche Eknishth Mavle- Gupher Bahirji Naik By Prashant Kulkarni ( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी )New Book
Shivrayanche Eknishth Mavle- Gupher Bahirji Naik By Prashant Kulkarni ( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी )New Book
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते.
स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते.
सदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.