Skip to product information
1 of 5

Shivnetra Bahirji Naik Khand 4 By Prem Dhande ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक - प्रेम धांडे ) Author Sign copies + मोफत कुरिअर

Shivnetra Bahirji Naik Khand 4 By Prem Dhande ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक - प्रेम धांडे ) Author Sign copies + मोफत कुरिअर

Regular price Rs. 449.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 449.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Prebooking is on -
Book Available After Publishing - 20 Jan 2025

Offer- 
Author Sign copies + 499 मध्ये घरपोच
मोफत - ऐतिहासिक शिवनेत्र कीचेन

पाने - ४५० + 
या पुस्तकामध्ये 19 स्केचेस, 3 नकाशे - 1 कलर नकाशा, 2 कलर इमेज पाहायला मिळतील.


शिवनेत्र बहिर्जी नाईक  
खंड ४ 
•    आदिलशाही क्रूर सरदार अजीजखान हा स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधीच त्याला १० जून १६६४ ला  कुडाळजवळ विषप्रयोग करून संपवण्यात आले. पण त्याच्यावर तो विषप्रयोग कोणी केला ? 
•    हजारोंच्या संख्येने सैन्यबल असलेल्या अजीजखानाच्या छावणीत घुसून त्याला मारण्याची आणि त्या छावणीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची ताकद फक्त मराठा गुप्तहेरांमध्येच होती. पण तो पराक्रमी गुप्तहेर कोण होता  ? आणि त्याने आपली ती धाडसी कामगिरी कशी पार पाडली ? 
•    सुरतेच्या लुटीचा प्रतिशोध घेण्यासाठी मोघल बादशाहा औरंगजेबाने विजापूरच्या आदिलशाहावर दबाव आणला, त्याला बळी पडून आदिलशाहाने पुन्हा एकदा आपली शक्तिशाली फौज स्वराज्यावर पाठवली. त्या फौजेचे नेतृत्व करत होता प्रती अफजलखान म्हणून ओळख असलेला ‘खवासखान’. 
•    खवासखानाने शिवाजी राजांना संपवण्याची प्रतिज्ञा केली. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या तलवारीवर शिवाजी राजांचे नाव कोरले. पण त्याचा तो प्रण फुसका ठरला. शिवाजी राजांनी आपल्या गुप्तहेर खात्याला सक्रीय करून त्याच्या मोठ्या फौजेला एकत्र येऊ दिले नाही. राजांनी सर्वप्रथम आपल्या पित्याचा शेवटचा शत्रू बाजी घोरपडेला संपवले आणि खवासखानाला विजापूरपर्यंत पळवत नेले.  शिव इतिहासात  आजवर फारसा प्रकाशझोतात न आलेला राजांचा हा अनोखा पराक्रम आणि बहिर्जी पथकाच्या शौर्यगाथेचा एक छुपा अध्याय. 
•    शेकडो वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी विदेशी शासकांपासून मायभूमी स्वतंत्र करण्याचे पहिले कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांनी दक्षिणेतील एक महत्वाचे बंदर ‘बसरुर हे पोर्तुगीजांपासून मुक्त केले. 
•    बसरूर जवळील एका बेटावर पोर्तुगीजांनी त्यांचे ‘बर्सिलोर’ हे ठाणे उभारले होते. गोव्या पोर्तुगीजांना गाफील ठेऊन राजे बर्सिलोरला पोहोचले आणि तिथल्या साडेतीन हाजार पोर्तुगीज सैनिकांना एकाच दिवसात पूर्णपणे संपवून राजांनी पोर्तुगीज वखारी लुटून साफ केल्या. 
•    सुरतेच्या लुटीनंतरची ही सगळ्यात मोठी मोहीम होती. ह्या मोहिमेचे वेगळे महत्व होते. ते म्हणजे ह्या वेळी शिवरायांनी केलेले दोन प्रमुख अविष्कार ‘बहिर्जी गुप्तहेर पथक’ आणि ‘मराठा आरमार’ ह्यांचा ह्या मोहिमेत एकत्रितपणे सहभाग होता.  
•    आदिलशहा राजांचा बिमोड करू शकत नाही हे पाहून औरंगजेबाने आपला मुत्सद्दी सेनानी मिर्झा राजा जयसिंगाला दक्षिणेत पाठवले. त्याने राजकारणाचा डाव आखून राजांना कात्रीत पकडले आणि राजांना आग्र्यात आपल्या पुत्राला सोबत घेऊन जावे लागले. पण राजांना बादशाहावर विश्वास नव्हता. त्यांनी आपले छुपे अस्त्र ‘बहिर्जी पथक’ सक्रीय केले आणि बादशाहाला त्याच्याच दरबारात संपवण्याची योजना आखली पण मुत्सद्दी औरंगजेबाने ती योजना सफल होऊ दिली नाही आणि राजांना कैद केले. 
•    विषारी सापाच्या विळख्यातून ही बाहेर पडावे तसे महाराज औरंगजेबाच्या त्या कैदेतून बाहेर पडले. पण ते इतके सोपे नव्हते. बहिर्जी नाईकांनी आखलेली ती एक थरारक योजना होती. एक विलक्षण गूढ गाथा. बहिर्जी नाईकांनी ती योजना कशी आखली ? आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ? शेवटी ती योजना कशी सफल ठरली ?

View full details