Shivnetra Bahirji Khand 1 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी खंड १)
Shivnetra Bahirji Khand 1 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी खंड १)
Couldn't load pickup availability
इतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा !!
________________________
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...?
अगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले.
ते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!
शिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.
चार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते –
• शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट.
• बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली.
• स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा.
• स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान.
• जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट.
Share
