Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set
Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set
Couldn't load pickup availability
1) शिवचरित्र - छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
_____________________________________________________________________________________
शिवरायांचे एकनिष्ठ मावळे-
• बहिर्जी नाईक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख, जे वेश बदलून शत्रूच्या गोटातून माहिती मिळवत असत.
• नेतोजी पालकर: शिवरायांचे सरसेनापती, ज्यांनी सुलतानी संकटांशी दोन हात करून गावाचे रक्षण केले आणि अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला.
• तानाजी मालुसरे: निष्ठावान मावळा, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य दाखवून विजय संपादन केला आणि सिंहगड मोहिमेत अजरामर झाले.
• हंबीरराव मोहिते: 'मोडेल पण वाकणार नाही' वृत्तीचे, रांगडे सरसेनापती ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळात अमोघ कार्य केले.
• शिवा काशीद: शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, शिवरायांसारखे दिसणारे एक सामान्य कुटुंबातील शूरवीर.
• बाजीप्रभू देशपांडे: पहाडासारखे भक्कम शरीराचे, पराक्रमी लढवय्ये आणि प्रशासनातही पारंगत असलेले महान योद्धा.
• कान्होजी जेधे: शहाजीराजांचे विश्वासू सरदार आणि मावळ भागातील देशमुखांना एकत्र करून स्वराज्यात आणणारे जुने जाणते व्यक्तिमत्त्व.
• जिवाजी महाला: भेदक नजर आणि भरभक्कम शरीरयष्टी असलेले दांडपट्टा बहाद्दर, ज्यांनी सय्यद बंडाचा हात कलम करून महाराजांचा जीव वाचवला.
• येसाजी कंक: चपळ, निर्भय आणि धाडसी व्यक्तिमत्त्व, जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात उभे राहिले.
• कोंडाजी फर्जंद: अचाट धाडस असलेले, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला युद्धासाठी आव्हान देणारे महावीर.
• बाजी पासलकर: मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील पहिली समिधा.
• प्रतापराव गुजर: धाडसी वीर आणि हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती ज्यांनी साल्हेर येथे मुघलांचा पराभव केला.
• रामजी पांगेरा: 'अग्नीप्रमाणे वीर' असे वर्णन केलेले पराक्रमी योद्धा, ज्यांनी कण्हेरगडावर दिलेरखानाच्या हजारो सैन्याला माघार घ्यायला लावली.
• मुरारबाजी देशपांडे: पुरंदरच्या लढाईत प्रचंड शौर्य गाजवणारे, ज्यांच्या पराक्रमाने दिलेरखानही थक्क झाला.
• नऱ्हेकर देशपांडे (बापूजी, चिमणाजी, बाळाजी, केसो नारायण, नारायण): खेडेबारेतील ही कुटुंबियांची तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले.
• फिरंगोजी नरसाळा: चाकणचे शूर किल्लेदार, ज्यांनी शाहिस्तेखानाच्या हजारो सैन्याला केवळ तीनशे मावळ्यांनिशी छप्पन्न दिवस झुंजवले.
• हिरोजी इंदुलकर: वास्तूविशारद, ज्यांनी सिंधुदुर्ग आणि रायगडची अप्रतिम रचना केली आणि आपली स्वामीनिष्ठा दाखवली.
• बाळाजी आवजी चिटणीस: शिवरायांना राजापुरात मिळालेले अनमोल रत्न, ज्यांनी आपल्या मोत्यासारख्या अक्षराने अनेक नाजुक प्रश्न सोडवले.
Share
