Skip to product information
1 of 4

(Shivarayanche Rantandav + Shivratna Shiva Kashid + Gupther Bahirji Naik ) By Prem Dhande, Nanvath Jagtap, Arti Jagtap (शिवरायांचे रणतांडव + शिवरत्न शिवा काशीद+ गुप्तहेर बहिर्जी नाईक)

(Shivarayanche Rantandav + Shivratna Shiva Kashid + Gupther Bahirji Naik ) By Prem Dhande, Nanvath Jagtap, Arti Jagtap (शिवरायांचे रणतांडव + शिवरत्न शिवा काशीद+ गुप्तहेर बहिर्जी नाईक)

Regular price Rs. 1,038.00
Regular price Rs. 1,297.00 Sale price Rs. 1,038.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

16 डिसेंबरपासून सर्वत्र उपलब्ध

शिवरायांचे रणतांडव | पाने - २८० - 399/-

नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...

अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी! 
पन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!
त्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!
रक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...
'शिवरायांचे रणतांडव'

शिवरत्न शिवा काशीद | लेखक - प्रेम धांडे - ४९९/

त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. 
शिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.   
 तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !
त्याचा चेहरा शिवाजीराजांच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राजांच्या आणि त्याच्या नावात साम्य होते. जणू राजांची सावलीच तो! त्याच्या पत्नीचा आणि महाराणी सईबाईसाहेबांचा मृत्यूदेखील एकाच महिन्यात झाला होता. म्हणजेच, वाट्याला आलेले दु:ख देखील सारखेच! राजांप्रमाणेच तो पराक्रमासाठी सदैव आसुसलेला असे. जसे शिवराय आपली मऱ्हाठभूमी अत्याचारी तुर्कांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत होते, तसेच तो पन्हाळा यवनी जाचातून मुक्त व्हावा, यासाठी कायम धडपडत होता.
दोघांमध्ये एवढे साम्य कसे? हा फक्त योगायोग होता, की विधात्याची अद्भुत किमया ?  
या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!

गुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप - 399/-
पाने - ३२० 

मी बहिर्जी नाईक
,

स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.  माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....

View full details