Shivarayanche Rantandav By Prem Dhande + Gupther Bahirji Naik By Navnath Jagtap, Arti Jagtap + Ganima Kava By Navnath Jagtap ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + गनिमी कावा)
Shivarayanche Rantandav By Prem Dhande + Gupther Bahirji Naik By Navnath Jagtap, Arti Jagtap + Ganima Kava By Navnath Jagtap ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + गनिमी कावा)
Couldn't load pickup availability
16 डिसेंबरपासून सर्वत्र उपलब्ध
1) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे - 399/-
पाने - २८०
नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...
अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!
पन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!
त्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!
रक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...
'शिवरायांचे रणतांडव'
2) गुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप - 399/-
पाने - ३२०
मी बहिर्जी नाईक,
स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
3) गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप
पाने - १५२
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.
डॉ. बाळकृष्ण
थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू
असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.
अंबे कॅरे
एक प्रसिद्ध समकालीन इंग्रज वकील
Share
