Shivaji The Management Guru Bhag 1 Ani 2 By Namdevrao Jadhav
Shivaji The Management Guru Bhag 1 Ani 2 By Namdevrao Jadhav
Couldn't load pickup availability
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहीती देतं. हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहीती देऊन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केली पाहीजेत याची माहीती देतं. व्यवस्थापनाची सारी आवश्यक कौशल्य आणि नियोजन कसे करावे याबाबत हे पुस्तक माहीती देतं. नियोजनाचे टप्पे आणि निर्णय प्रक्रिया यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. आयुष्यात प्रत्येकाला निर्णय हा घ्यावाच लागतो. तेव्हा अचूक निर्णय कसा घ्यावा हे तुम्हाला शिकायला मिळेल. जग जिंकायचे तर तुम्हाला नेतृत्व हे करावंच लागतं तेव्हा नेतृत्व म्हणजे काय ? नेतृत्वाचे यशस्वी पैलू कोणते आणि ते कसे आत्मसात करावे याचे मार्गदर्शन तुम्हाला था पुस्तकातून मिळेल. लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा दिल्या म्हणजे लोक तुमच्याभोवती गोळा होतात आणि ते कसे हाताळले जातात याची माहिती मिळते. जगावेगळी प्रेरणादायी उदाहरणे या पुस्तकातून तुम्हाला मिळतील आणि एक यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक किंवा नेता म्हणून तुमचं आयुष्य घडविण्यासाठी हे पुस्तक तत्पर असल्याचे प्रथमदर्शनीच तुम्हाला कळून येईल. आयुष्याला दिशा देणारे हे पुस्तक एकदा नाहीतर अनेक वेळा वाचून काढावे आणि अंमलात आणावे असेच आहे. तुम्ही एक महत्वकांक्षी व्यक्ती आहात. जग जिंकण्याची तुमची मानसिकता आहे म्हणूनच तुम्ही हे पुस्तक पाहता क्षणीच खरेदी केलेलं आहे. चला तर आता ते वाचू ते आत्मसात करु आणि जग जिंकूया.
Share

