Shirish Rang By Arun Shevate ( शिरीष रंग )
Shirish Rang By Arun Shevate ( शिरीष रंग )
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
शिरीषमाया
पिता आणि कविता या दोन सबळ श्रद्धांच्या बळावर आयुष्यातील सारे चढउतार सहज पार पाडून लीलया पैलतीरी गेलेली स्त्री म्हणजे माझी आई, शिरीष पै. पती (व्यंकटेश पै) आणि आम्हा दोन्ही पुत्रांवर तिचे निरतिशय प्रेम होते. सुना आणि नातवंडांवर तिने नेहमीच चिरंतन मायेचा वर्षाव केला. तिच्या बहिणीसाठी (मीना देशपांडे) तिच्या हृदयाच्या कप्प्यात एक जिव्हाळ्याचे ध्रुवस्थान तिने राखून ठेवले होते. तिच्या भवसागरात आणि भावसागरात ज्या ज्या व्यक्ती तिच्या सान्निध्यात आल्या त्या सर्व तिच्या प्रियजन होऊन गेल्या; परंतु या साऱ्या नात्यागोत्यांपाठी जी भक्कम बैठक होती ती पिता आणि कविता याच दोन सबळ श्रद्धांची !
- राजेंद्र पै