Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan By Dr. Chandra Bhanu Satpathy (शिर्डी साई बाबा: प्रेरणादायी जीवन)
Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan By Dr. Chandra Bhanu Satpathy (शिर्डी साई बाबा: प्रेरणादायी जीवन)
Couldn't load pickup availability
शिर्डी साईबाबांचे भक्त भारत तसेच परदेशांतही पसरलेले आहेत. हे सर्व भक्त त्यांच्याकडे आले ते आध्यात्मिक ओढ आणि शिर्डी साईंचा प्रेमळपणा, साधेपणा यामुळे. या पुस्तकामध्ये शिर्डी साईंच्या जीवनाचा बांधीव आणि शक्य तितक्या कालक्रमानुसार दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये काही प्राथमिक स्रोत आणिकागदपत्रे वापरलेली आहेत, जी आजपर्यंत उजेडात आलेली नव्हती! त्यामुळे लोकांच्या मनात बाबांशी संबंधित प्रश्नांबद्दल काही गृहीतके रेंगाळत राहिली. ही कागदपत्रे लेखकानेविविध स्रोतांद्वारे एकत्रित केली आहेत. अतिवर्णनात्मकता टाळून लेखकाने सरळ, साध्या शैलीत साईबाबंविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शिर्डी साईबाबांचे दिव्य व्यक्तिमत्त्व, उदात्तहेतू, तत्त्वज्ञान हे भक्तांच्या, वाचकांच्याआणि इतर संशोधकांच्या सहज समोर येते.
शिर्डी साईबाबांवर भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्यावरील पहिले पुस्तक श्री साईसच्चरित हे १९२९मध्ये श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनी प्रकाशित केलेले पुस्तक मुख्य संदर्भ म्हणून वापरले आहे.
आपल्या भक्तांना संकुचित विचारसरणी, कट्टरतावाद आणि पूर्वग्रह यातून बाहेर काढण्याचे शिर्डी साईबाबांचे नवेनवे मार्ग होते. अगदी खोड्याकाढताना, विनोद करतानाही ते आपल्या भक्तांना एक आश्वासक, संरक्षक आणि सांत्वन करणारा अर्थ द्यायचे. शिर्डीच्या साईबाबांचा स्पर्श, दृष्टिक्षेप, शब्द भेटणाऱ्यांवर जादुई परिणाम करायचा! हे पुस्तक वाचताना साई बाबांचे हेच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते.
Share
