Skip to product information
1 of 2

Shikshan Karyakramaat Tin Maa Cha Adhar By Raya Narhari Naik (शिक्षण कार्यक्रमात तीन मा चा आधार- राय नरहरी नाईक ))

Shikshan Karyakramaat Tin Maa Cha Adhar By Raya Narhari Naik (शिक्षण कार्यक्रमात तीन मा चा आधार- राय नरहरी नाईक ))

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 180.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

शिक्षणप्रक्रियेत शोधा, अनुभव घ्या व वापरात आणा हे उपक्रम जाणकार शिक्षकाना पटतात, पचतात व सक्षमही करतात हेच सत्य. श्री राय नरहरी नाईक गोवा राज्याच्या शिक्षण खात्यात शिक्षक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत असताना खास करून तेव्हांच्या राज्य शिक्षण संस्थेत "अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती, सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम प्रमुख म्हणून कार्यरत असताना शालेय शिक्षण कार्यक्रमात जे त्यानी शोधले, अनुभव घेतले व पालक व शिक्षकासाठी वापरले शिक्षका मार्फत, शिक्षणाधिकाऱ्या मार्फत प्रत्यक्ष कार्यरुपात आणले तेच अनुभव या पुस्तकालीत लेखांच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. आपल्या पाल्यावर संस्कार, सुसंस्कृतपणे वागण्यास व समर्थपणे जगण्यास सदृढ करण्यास झटणाऱ्या पालकानी व तीन "आर" च्या शिक्षणाने कौशल्याचे शिक्षण देवून आपल्या विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यास समर्थ करणाऱ्या शिक्षकानी श्री नाईक यांचे हे पुस्तक जरुर वाचावे, अभ्यास करावा, शोधावे, अनुभव घ्यावा व आप आपल्या उपक्रमात प्रत्यक्ष आचरणात आणावे. म्हणजे पालक म्हणून समर्थ व्हाल, शिक्षक म्हणून सक्षम व्हाल व शिक्षणाधिकारी, म्हणून सामार्थ्यवान व्हाल. फक्त वाचूनच थांबुनये आपल्या पाल्यावर करायाच्या संस्काराच्या उपक्रमावर पालकांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर शिक्षकांनी या पुस्तकातील तीन "मां" चा आधार या लेखा बरोबरच इतर लेख वाचून, जाणून घेवून, आधार घेवून, अनुभव घेवून कृती केल्यास आपल्या कोवळ्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेताना पालकाना आधार मिळेल. व विद्यार्थ्याला शिकवितानाही व विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवितानाही शिक्षकांची उमेद वाढेल. श्री नाईक यांनी "पोलिस तक्रार करताना पालकांनी शिक्षक व्हावे". मूलभूत Z शिक्षण मिळवून देणे हे शिक्षण हक्क कायद्याचे उदिरष्ठ, सातत्यापूर्ण सर्वंकष शिक्षण गरजेचे अशा लेखातून शिक्षकाना व नानापासीचा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क अशा लेखातून शिक्षणधिकाऱ्याना गरजेचे असलेल्या कार्यक्रमाची व दृक्क व श्राव्य उपक्रमाची जाणिव करून दिलेली आहे.

श्री नाईक शिक्षणाधिकारी, खास करून गोवा राज्य शिक्षण संस्थेत कार्यरत असताना "शाळा समुह योजना, १९८६ चे शैक्षणिक धोरण व १९९२ चा कृतियुक्त उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम नियोजन, पाठ्यपुस्तक निर्मिती उपक्रमात शाळा तपासणी उपक्रम नियोजनबध्द उपक्रमाची आखणी, मांडणी व अमलबजावणी च्या संदर्भात मुख्याध्यापकाना, शिक्षणाधिकाऱ्यांना उपयुक्त नमूना (क्यू फॉर्म) तयार करण्याच्या व प्रत्यक्षात आचरणात आणण्याच्या उपक्रमात मुख्याध्यापकाना व तपासणी अधिकाऱ्याना मार्गदर्शन करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची व श्री नाईक बरोबर कार्य करण्याची संधी मला मिळाली. समूहांतर्गत उच्च माध्यमिक शिक्षकांना, माध्यमिक शिक्षकांना, प्राथमिक शिक्षकाना, पालकाना, त्यांच्या विद्याथ्यांची व पाल्यांची त्या त्या स्थरावरील आवश्यक क्षमता वाढवून, वरच्या स्थरावरचे शिक्षण घेण्यास, प्रत्येक स्थरावरील गरज जाणून घेवून प्रत्येक स्थरावरच्या शिक्षकांची मदत घेवून आवश्यक क्षमता सर्व विद्यार्थ्यांत रुजु करण्यास मार्गदर्शनाचे उपक्रम राबविण्यास व शिक्षका बरोबरच शाळा समूहाचाही दर्जा वाढविण्याचे उपक्रम करण्याची संधी मला श्री नाईक यांच्याबरोबर काम करताना मिळाली. गोवा राज्यात त्या वेळी कार्यरत असलेल्या "माध्यमिक शिक्षा अभियान" उपक्रमात एक सभासद म्हणून कार्यरत असताना श्री नाईक यांच्या बरोबर आपले अनुभव वापरुन अभियानचे उपक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्न करण्याची संधी मिळाली. व आपली क्षमताही वाढीस लागली. या त्यांच्या लेखनातून आज उजळणीही झाली. श्री. नाईक यांचे हे कार्य चालूच राहिले पाहिजे आमच्या अनुभवांची उजळणी होतच राहु द्या हीच अपेक्षा.

View full details