Sherlock Holmeschya Sahasi Katha By Sir Arthur Conan Doyle (शेरलॉक होम्सच्या साहसी कथा जगभर गाजलेल्या साहसी कथा)
Sherlock Holmeschya Sahasi Katha By Sir Arthur Conan Doyle (शेरलॉक होम्सच्या साहसी कथा जगभर गाजलेल्या साहसी कथा)
Couldn't load pickup availability
शेरलॉक होम्स हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डायल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत.
शेरलॉक होम्सच्या व्यक्तिरेखांचा व कथांचा प्रभाव नंतरच्या सर्वच गुप्तहेरकथांवर जाणवतो. बंगालीतील व्योमकेश बक्षी यांच्यावर व सत्यजित राय यांच्या फेलूदावरही हा प्रभाव दिसून येतो. शेरलॉकवरचे चलच्चित्रपट इतके प्रसिद्ध पावले की ऑर्थर कॉनन डायल यांना इंग्लंडच्या राणीने 'सर' हा किताब दिला.
'दि फायनल प्रॉब्लेम' कथेमधे डायल यांनी शेरलॉक आणि जेम्स मोरी आर्टी यांच्या झटापटीत दोघे राईशेनबाख धबधब्यावरून पडून मृत्युमुखी पडतात, असे दाखवले. शेरलॉकला संपवायचे, असा त्यांचा साधा हेतू होता. मात्र यावर जगभरातील वाचक खवळले. परिणामी त्यांना शेरलॉकच्या आठवणी लिहाव्या लागल्या. त्यातही वाचकांचे समाधान न झाल्याने, अखेरीस आपल्या कथातून त्यांना शेरलॉकला परत जिवंत करावे लागले.
शेरलॉक होम्सचा कथेतील पत्ता, २२१ बी, बेकर रस्ता, लंडन असा आहे. या रस्त्यावर मुळात लंडनमधे या क्रमांकाचे घरच नव्हते. जेव्हा रस्ता वाढून ही घरे बनली, तेव्हा २२१ बी क्रमांकाचे घर २२१ बी, शेरलॉक संग्रहालयाकरिता राखून ठेवले गेले.
Share
