Skip to product information
1 of 4

Shashi Bhagwat Combo Set 3 Books ( शशी भागवत कॉम्बो सेट 3 बुक्स )

Shashi Bhagwat Combo Set 3 Books ( शशी भागवत कॉम्बो सेट 3 बुक्स )

Regular price Rs. 1,499.00
Regular price Rs. 1,999.00 Sale price Rs. 1,499.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

 

1) रत्न-प्रतीमा : पाने ४६४ | ३९९/-

रत्न-प्रतिमेचे गुंतागुंतीचे अनेक पदरी महावस्व श्री भागवतांनी मोठ्या हुशारीने विणले आहे या कथानकाला प्राचीन काळाची हुब देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत आजच्या भाषासरणीशी अपरिचित अशा अनेक संस्कृत शब्दांचा वापर त्यांनी मोठ्या चतुराईने केला आहे.ही अद्भुतरसाची वाट थोडी अवघड, तीवर फारसे कुणी पाऊल घालीत नाही. कुणी या वाटेने माता सरस्वतीच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच तर अपार कष्टांशिवाय त्याला या प्रांतात यश लाभणे अशक्यप्राय 'मर्मभेद' कादंबरी लिहून श्री. शशी भागवतांनी या प्रांतात प्रवेश तर केलाच, पण यशाचा झेंडाही रोवला. रत्न-प्रतिमा' लिहून त्यांनी त्या प्रांतातला आपला शिक्का खणखणीत बंदा रुपया आहे. ही गोष्ट सिद्ध केली आहे.

2) मर्मभेद : पाने ५९२ | ७००/-

सम्राट चंद्रकेतु महाराज, वीरभद्र आदि सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमीच घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्दयाकडे पाहू लागली. त्या योध्दयाने शांतपणे आपल्या मुखावरील पटल दूर केले. त्या मुखपटलाआड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युत्पात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णान्त पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. "युवराज कुणाल ?" कृष्णान्त अविश्वासाने ओरडला. "युवराज कुणाल..." सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली. "युवराज.." तेजस्विनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसऱ्याच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रांत अश्रू दाटून आले. "होय; युवराज कुणाल !" तो योद्धा शांतपणे म्हणाला. "परंतु निर्बल, बुद्धिहीन आणि निस्तेज युवराज नव्हे." "अशक्य... अशक्य..." 

3) रक्तरेखा : पाने ७७६ | ९००/- 

सोलापूरच्या, कानडी ढंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने 'मराठी विषय घेऊन कसाबसा मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश मिळविला... आणि आठ दिवसात प्रा. बा. ल. कुलकर्णी यांनी त्याला 'मराठी' च्या बाहेरची वाट दाखविली, माझे 'मराठी चांगले नसावे. कदाचित मुलींच्या देखत झालेला तो मानभंग मला बोचला आणि मला लेखक करून गेला, पण नाही! मी लहानपणी शाळेतही काहीबाही लिहीत होतोच पण तरीही हे तेवढ्यामुळेच घडले असावे, असेही नाही... त्याला अगम्य, अतर्क्स असे काही वेगळेच कारण असावे- मागील जन्मी माझे हे अपूर्ण राहिलेले कर्म ही असण्याचा संभव आहे, म्हणजे हा पुनर्जन्म...? होय, पुन:र्जन्मावर निदान माझा तरी विश्वास आहे... त्या शिवाय 'कर्म' ह्या गोष्टीला काही अर्थच नाही. आज ह्या गोष्टीला काही अर्थच नाही...! आज ह्या 'स्क्तरेखे ला साक्षी ठेवून 'मी' संकल्प सोडतो आहे... मी आज लिहिणार आहे, ते पुन:र्जन्मवर...! 'पुन्नः प्रहार' !


View full details