Sharyat Shikshanachi By V. Raghunathan, Purnima Kundetkar(Translators) (शर्यत शिक्षणाची)
Sharyat Shikshanachi By V. Raghunathan, Purnima Kundetkar(Translators) (शर्यत शिक्षणाची)
मुलांचं शिक्षण म्हणजे वेगाची शर्यत नसून तिचं साधर्म्य मॅरेथॉन शर्यतीशी नक्कीच आहे! पुस्तकाचे लेखक व्ही. रघुनाथन या पुस्तकाव्दारे पालकांना जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला प्रवृत्त करतात. मुलांच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुलांना वेगाच्या ‘शर्यतीत जुंपण्यापेक्षा’ त्यांना ‘लंबे रेस का घोडा’ होण्यास तयार करणे अधिक योग्य आहे. एखादी गोष्ट साध्य करणं मुलांना शक्य न झाल्यास पालक स्वत:च नाउमेद होतात. वास्तविक अशा वेळी खचून न जाता ती संधी मुलांचं व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकसित करण्यासाठी वापरली तर ते त्यांच्या फायद्याचंच होईल. अकारण लादल्या गेलेल्या अभ्यासातून चढाओढीने एखाद्या ठिकाणी पोहचण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचा एखाद्या वेगळ्या वाटेने झालेला प्रवास नक्कीच अधिक आनंददायक असेल. अशा प्रकारचा अनुभव घेऊन आयुष्य पुरेपूर जगणाऱ्या काही प्रसिध्द आणि सर्वसामान्य अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींची उदाहरणंही पुस्तकात दिली आहेत. एन.आर.नारायणमूर्ती, डॉ.कलाम, अंजीरेड्डी, अश्विनी नचप्पा, ईला भट्ट यांचा या प्रसिध्द व्यक्तींमध्ये समावेश आहे. मग तुम्ही तुमच्या मुलाला आयुष्याच्या शर्यतीत वेगाने भरधाव पळायला लावणार की जीवनाचा आनंद घेत शर्यत पूर्ण करू देणार? एक विचार-दृष्टी देणारं पुस्तक…शर्यत शिक्षणाची…