Sharyat By Ishwar Trimbak Aagam
Sharyat By Ishwar Trimbak Aagam
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जुनी जाणती माणसं आजही म्हणतात, 'घरात एक पैलवान आणि दारणीला दोन बैल असायलाच पाहिजेत. चारशे वर्षांपासून चालत आलेला हा पारंपरिक खेळ, बंदीची उणीपुरी सात वर्षे उलटून गेली, तरी आजही दरवर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोप-यात तेवढ्याच उत्साहात आणि जल्लोषात आयोजित केला जातो. कोण नावासाठी खेळतं तर कोण मानासाठी! कुणी प्रतिष्ठ्येसाठी तर कुणी पैशासाठी! तर कुणी रखेळतं समोरच्याची जिरवण्यासाठी! मग तिथं पैशाला मोल नाही. या खेळात टिकायचं असेल तर हवा संथम, जिद्द आणि चिकाटी! योग्य वेळ आली की कार्यक्रम होणारच ! असं म्हणतात की, भारतात असं कोणतं क्षेत्र नाही जिथं राजकारण नाही. तसंच महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही, तिथं बैलगाडा शर्यतीचं नाव नाही. आणि म्हणूनच हा विषय सर्वसामान्य माणसाच्या काळजात चार-पाचशे वर्षापासून घर करून राहिलेला आहे. हा नाद जेवढा चांगला दिसतो, तेवढाच वाईटही आहे. हा खेळ म्हणजे नाण्याच्या दोन बाजू!
Share

