Skip to product information
1 of 1

Sharirsampada By K P Bhagwat

Sharirsampada By K P Bhagwat

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

लेखकाचा परिचय

जन्म १९१३. शिक्षण पुणे ये नू.म. विद्यालय, स. प. कॉलेज तसेच मुबई येथील जी. एस्. मेडिकल कॉलेज. फायनल एम्. बी. बी. एस्. पर्यंत जाऊन काही कारणाने शिक्षणक्रम सोडून दिला. याच शिक्षणक्रमात मानसशास्त्राची आवड उत्पन्न झाली. १९४४ साली 'आईबाप व मुले' व १९४६ मध्ये 'वैवाहिक जीवन' लिहिले. पहिल्या पुस्तकाची चवथी तर दुसऱ्या पुस्तकाची नववी आवृत्ती निघाली आहे. १९४८ साली टि. म. विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिले बाल-मार्गदर्शन केंद्र काढले. नंतर ते रिमांड होमला जोडले. १९६२-१९६४ पर्यंत रमणबागेत असेच केंद्र स्वखर्चाने चालविले. १९४९ मध्ये महाराष्ट्रात मतिमंद मुलांचा पहिला वर्ग काढला. १९५० - १९६१ पर्यंत पुणे विद्यापीठाच्या प्रायोगिक मानसशास्त्र विभागात काम केले व तेथील प्रयोगशाळा सुसज्ज केली. १९५९ मध्ये पुणे येथील शि. प्र. मंडळीस वीस हजार रुपयांची देणगी दिली. १९६१ मध्ये विद्यापीठाचा राजीनामा दिला व मेव्हणे श्री. पंडितराव तुळपुळे यांच्या सहाय्याने 'आनंद एजन्सीज' नावाचा मानसशास्त्रीय उपकरणे बनविण्याचा कारखाना काढला. त्यास सर्व विद्यापीठांचा उत्तम प्रतिसाद आहे. १९८२-१९८३ मध्ये 'शरीर संपदा' व 'शास्त्रोक्त व्यायाम' ही पुस्तके लिहिली. १९८८ साली 'व्यायाम दिपिका' हे पुस्तक लिहिले. तीनही पुस्तकांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. १९९५ साली 'व्यायाम विज्ञान' हे पुस्तक लिहिले. ३१ डिसेंबर १९८९ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळास भारतीय विवाह संस्थेचे आद्य इतिहासकार कै. वि. का. राजवाडे यांचा अर्धपुतळा भेट म्हणून दिला. १९८३ नंतर 'आनंद एजन्सीज' मध्ये शारीरिक शिक्षणशास्त्राच्या प्रयोग शाळेस लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन सुरू केले. त्याला शारीरिक शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बायसिकल इर्गोमीटर या उपकरणास पारखे पारितोषिक मिळाले. आनंद एजन्सीला अमेरिकन सायकॉजिकल कार्पोरेशन व ॲकॅडेमिक प्रेस यांचे हिंदुस्तानातील प्रमुख वितरक म्हणून मान्यता आहे. १९९३ मध्ये 'विचित्र वाटचाल' हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले

View full details