Shapvimochan By Govind Narayan Datarshastri
Shapvimochan By Govind Narayan Datarshastri
Couldn't load pickup availability
विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात शापविमोचन ही कादंबरी इंदुप्रकाश व सयाजी विजय या दोन वर्तमानपत्रात क्रमश: प्रसिद्ध होत होतीवर्तमानपत्रात कादंबरी पूर्ण झाल्यावर 1915 मध्ये ती पुस्तक रुपानेप्रसिद्ध झाली. पुराण कथांमध्ये शाप व उ:शाप असतात व उःशापानंतर शापातून मुक्तता होते अशा कथा पुराणात आढळतात. त्याच धर्तीवर ही कादंबरी रचली आहे. सुरुवातीला म्हटले आहे की युधिष्ठिर शकाच्या 1596 या वर्षी हे कथानक घडते.म्हणजे शकारंभाच्या मागे साडेतीन हजार वर्षे जावे लागते. म्हणूनच कादंबरीत गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर यांना मिळालेले उ:शाप यांची वर्णने आहेत. व्यसनाधिन माणसाची कशी दुर्दशा उडते हेही या कादंबरीत दाखविले आहे. एकंदरीत ही कादंबरी वाचकाला पौराणिक कालखंडात घेऊन जाते व तेथील अद्भूत विश्वात तो रमतो आणि त्याचे मन चकितही होते. पौराणिक स्वरुपाची ही कादंबरी तुम्ही हाती घेतल्यानंतर खाली ठेवणारच नाही अशी आमची खात्री आहे.
Share
