Set Of 6 Book : Shiv Sutra Bhag - 1 & 2 + Sakshatkarachi Denagi +Mrutyayushi+Krushnarang Sawala | By Osho
Set Of 6 Book : Shiv Sutra Bhag - 1 & 2 + Sakshatkarachi Denagi +Mrutyayushi+Krushnarang Sawala | By Osho
Couldn't load pickup availability
बीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!
अध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे.
शरीर आणि चेतना यांचा वियोग म्हणजे मृत्यू. निर्वाणाचा अर्थ आहे, दोन सत्यांची जाण! ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो. तो मृत्यू नाही आणि त्याला जीवन म्हणतो, ते म्हणजे जीवन नाही. जो साधू निर्णय न घेता साधू झाला, त्याच्या तुलनेत निर्णयपूर्वक चोर हा श्रेष्ठ आहे, त्याची जीवनस्थिती श्रेष्ठ आहे, कारण निर्णय त्याचा कॉन्शन्स वाढवतो. त्याच्या व्यक्तित्वाला वजन देतो. त्याची जबाबदारी वाढवतो. तो निर्णय त्याचं दायित्व बनतं. आणि स्वत:ने निर्णय घेतल्यामुळे एक संकल्प निर्माण होतो. संकल्प निर्माण झाल्यामुळे चेतना जागृत होते...
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात.
Share
