Set Of 5 : Karta Karvita Karyakarta+Rajdhanitun+Raoparva +Rajiv Gandhi Hatya..Ek Antargat Kat+Bharatatil Davya Chalvalincha Magova | By Vikas Lawande + Ashok Jain+Prashant Dixit+Avadhut Dongre+Praful Bidwai
Set Of 5 : Karta Karvita Karyakarta+Rajdhanitun+Raoparva +Rajiv Gandhi Hatya..Ek Antargat Kat+Bharatatil Davya Chalvalincha Magova | By Vikas Lawande + Ashok Jain+Prashant Dixit+Avadhut Dongre+Praful Bidwai
Couldn't load pickup availability
सार्वजनिक जीवनात व्यक्तिमत्वाची मूस घडत असताना विविधांगी विषयांचा स्पर्श झाल्यास नेतृत्वाची घडीव मूर्ती तयार होते. सुदैवाने आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विपुल ग्रंथभांडार आहे. या संदर्भग्रंथाची उंच चवड हाती घेण्यापूर्वी " कर्ता करविता कार्यकर्ता " सारख्या सुलभ पुस्तकाची पहिली पायरी चढून जाणे इष्ट आहे. शरद पवार साहेब ( अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉँग्रेस )
राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना, इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद-- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची पताका खांद्यावर घेतली नाही.
सरकारला बहुमत नसताना, काँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वतःचा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद असताना, डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी केली.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते.
लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं…