Set Of 5 Books : Changle Aai+Buddhiman Balkacha Janm+Sar Kahi Mulansathi +Sujan Palak Vhava Kasa+Aapli Mula | By Savita Damle + Nana Patil+ Shobha Bhagvat+Shivraj Gorle+ Shobha Bhagwat
Set Of 5 Books : Changle Aai+Buddhiman Balkacha Janm+Sar Kahi Mulansathi +Sujan Palak Vhava Kasa+Aapli Mula | By Savita Damle + Nana Patil+ Shobha Bhagvat+Shivraj Gorle+ Shobha Bhagwat
Couldn't load pickup availability
गोष्टी सहजपणे जशा घडतात तशाच घडू द्याव्यात, मुलांना वाटणारं कुतूहूल त्यांना मुक्तपणे विकसित करू द्यावं,आप्ली विचरशक्ती विकसित करण्याच्या मार्गावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करण्याची मुभा द्यावी.
आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.
आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोगरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.
आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.
कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे.
आपली मुलं 'मोठी' व्हावीत, 'चांगली' व्हावीत, 'यशस्वी' व्हावीत... असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे? आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची?
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे. माझं मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसं कसं वागेल? मुलांना चांगल्या-वाइटचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. आणि ‘देणं’ असं तरी कसं म्हणावं? ते त्यांना घेता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं खरं काम आहे.
Share
