Skip to product information
1 of 5

Set Of 5 Book : Krushnamrut+ Krushnasakha+Ha Shodh Vegla+Hasat Khelat Dhyandharana+Dhyansutr | By Osho

Set Of 5 Book : Krushnamrut+ Krushnasakha+Ha Shodh Vegla+Hasat Khelat Dhyandharana+Dhyansutr | By Osho

Regular price Rs. 832.00
Regular price Rs. 1,110.00 Sale price Rs. 832.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं.

`कबीर म्हणतात... गुरूदेव बिन जीव की कल्पना ना मिटे। शोधाची पहिली पायरी आहे अज्ञान. अज्ञानी कल्पनेमध्ये जगत असतो. कल्पना अज्ञानाचं सूत्र आहे; तर सत्य ज्ञानाचं. गुरु तुमचा हात धरून हळूहळू तुम्हाला सत्याकडे नेतो. गुरु तुम्हाला तुमच्या कल्पनेपासून मुक्त करतो. तुम्ही स्वत:च्याच आधाराने चालत राहिलात, शोधत राहिलात तर रस्ता चुकणारच. तुम्ही जे शोधत आहात ते त्याला कधीच मिळालेलं आहे. तुमच्यात आणि गुरुमध्ये एवढंच अंतर आहे की, तुम्ही प्रारंभ आहात तो अंत आहे.` कबीरांसारखे वेडे क्वचितच भेटतात.

ध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक दार आहे. ध्यान केवळ आध्यात्मिक पातळीवरच न राहता, त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, हे ओशोंनी अनेक दाखले देऊन समजावले आहे. मनाच्या पलीकडे जाऊन ध्यान काय आहे, हे ओशोच सांगू जाणे. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. ध्यानामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि तो अधिकाधिक विधायक होत जातो. ध्यान ही कल्पना धर्मातीत आहे.

महाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न वातावरणामध्ये ओशोंनी संचालित केलेल्या ध्यानशिबिरामधल्या प्रवचनांचं तसंच ध्यानाच्या प्रयोगांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. शरीर, विचार आणि भावना यांच्या एकेका पापुद्र्यांनी पेशीपेशींना विलीन करण्याची अद्भुत कला समजवताना ओशो आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य, तसंच संतुलनाकडे घेऊन जातात. पुस्तकातील अन्य विषय कामशक्तीचा सर्जनशील उपयोग कसा करावा? क्रोध म्हणजे काय? क्रोधाची शक्ती कोणती?

View full details