Set Of 5 Babasaheb Ghadatana + Dr. Salim Ali + Karta Karvita+PN Haksar Ani Indira Gandhi By Aakash Singh Rathore+Veena Gavankar+ Vikas Lawande+Satish Bhavsar+Jairam GaneshNivadak Baburao
Set Of 5 Babasaheb Ghadatana + Dr. Salim Ali + Karta Karvita+PN Haksar Ani Indira Gandhi By Aakash Singh Rathore+Veena Gavankar+ Vikas Lawande+Satish Bhavsar+Jairam GaneshNivadak Baburao
Couldn't load pickup availability
"बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक चरित्रे बरीच आहेत; पण आजवर त्यांचे व्यक्तिमत्व चित्रित करणारे चरित्र लिहिले गेलेले नाही. बाबासाहेबांनी काय विचार केला, काय लिहिले हे या चरित्रांमधून आपल्याला वाचायला मिळते; पण बाबासाहेब कोण होते, त्यांचे आंतरिक संघर्ष काय होते, त्यांच्या संवेदना काय होत्या यावर ही चरित्रे फारसा प्रकाश टाकत नाहीत. ती आंबेडकरांची माहिती देतात; पण त्यांच्या आंतरिक आयुष्याबद्दल आणि आधुनिक भारताच्या संवैधानिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणारा एक मनुष्य म्हणून आंबेडकरांची व्यक्ती म्हणून कशी वाढ होत गेली याबद्दल ही चरित्रे बोलत नाहीत.
'आपले सारे आयुष्य पक्ष्यांच्या रंगभ-या सुंदर विश्वावर उधळून देणा-या ऋषीतुल्य पक्षीतज्ञाची आणि जागरूक पर्यावरणवाद्याची जीवनकथा.
सार्वजनिक जीवनात व्यक्तिमत्वाची मूस घडत असताना विविधांगी विषयांचा स्पर्श झाल्यास नेतृत्वाची घडीव मूर्ती तयार होते. सुदैवाने आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विपुल ग्रंथभांडार आहे. या संदर्भग्रंथाची उंच चवड हाती घेण्यापूर्वी " कर्ता करविता कार्यकर्ता " सारख्या सुलभ पुस्तकाची पहिली पायरी चढून जाणे इष्ट आहे. शरद पवार साहेब ( अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉँग्रेस )
बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यापर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर.
इंदिरा गांधींच्या यशस्वी काळातील भारतातील कदाचित सर्वात प्रभावशाली व बलशाली वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्यांनी इंदिरा गांधींची प्रतिमा उंचावणे व ती निष्ठेने जपणे ही आपली जबाबदारी मानली, अशा पी.एन. हक्सर यांचे हे पहिलेच विश्वासार्ह चरित्र.