Set Of 4 Shyam Benegal +Babasaheb Ghadatana +Ratan Tata+Nivadak Baburao Arnalkar Babasaheb Ambedkaranchya Athavani
Set Of 4 Shyam Benegal +Babasaheb Ghadatana +Ratan Tata+Nivadak Baburao Arnalkar Babasaheb Ambedkaranchya Athavani
Couldn't load pickup availability
श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ १९७४ साली प्रदर्शित झाला व चित्रपटांकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ असे सामाजिक समस्याप्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचारप्रवृत्त होता होता, प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि ‘समांतर’ चित्रपट मुख्य धारेत येऊ लागले.
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.
"बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक चरित्रे बरीच आहेत; पण आजवर त्यांचे व्यक्तिमत्व चित्रित करणारे चरित्र लिहिले गेलेले नाही. बाबासाहेबांनी काय विचार केला, काय लिहिले हे या चरित्रांमधून आपल्याला वाचायला मिळते; पण बाबासाहेब कोण होते, त्यांचे आंतरिक संघर्ष काय होते, त्यांच्या संवेदना काय होत्या यावर ही चरित्रे फारसा प्रकाश टाकत नाहीत. ती आंबेडकरांची माहिती देतात;
बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक.
Share
