Set Of 4 : Savitribai Phule + Mahatma Jyotiba Phule+ Satyache Prayog+ Pratibhavant Sahityik Anna Bhau Sathe | By Rita Rammurti Gupta+ Jyotirao Phule+ Mahatma Gandhi+Yashwant Manohar
Set Of 4 : Savitribai Phule + Mahatma Jyotiba Phule+ Satyache Prayog+ Pratibhavant Sahityik Anna Bhau Sathe | By Rita Rammurti Gupta+ Jyotirao Phule+ Mahatma Gandhi+Yashwant Manohar
Couldn't load pickup availability
सावित्रीबाई फुले – रीता राममूर्ती गुप्ता
जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ साली झाला, जोतीरावांचे शिक्षण पुणे शहरातील शाळेत झाले. ती शाळा स्कॉटिश मिशनरी चालवत असत. या शाळेत ते इतर जातीच्या मुलांमध्ये मिसळत असत. त्यात अस्पृश्य जातींची मुलेही असत. तरुण वयातच त्यांनी अहमदनगर येथे अमेरिकन मिशनऱ्यांनी चालवलेल्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती आणि तिने ते अतिशय प्रभावित झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ऐन विशीत असतानाच त्यांनी कनिष्ठ जातीच्या मुलींकरता शाळा काढण्याची प्रेरणा घेतली. नंतर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्या शाळांतून महार, मांग आदी अस्पृश्य जातीच्या मुलांना प्रवेश दिला जात असे.
पहिल्यापासून माझे असे मत आहे की, जे एकाला शक्य आहे, ते सर्वांना शक्य आहे. त्यामुळे माझे प्रयोग खासगी म्हणून झालेले नाहीत, खासगी राहिलेलेही नाहीत. ते सर्वांनी पाहिले म्हणून त्यांची आध्यात्मिकता कमी होत असेल असे मला वाटत नाही. अलबत, अशा कित्येक गोष्टी असतात की, ज्या आत्म्यालाच समजणार, आत्म्यातच अंतर्धान पावणार. अशा गोष्टींचे वर्णन माझ्या शक्तीपलीकडचे आहे. माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक, धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म. अर्थात, ज्या गोष्टींचा निर्णय बालक, तरुण व वृद्ध करतात व करू शकतात, अशा गोष्टींचाच समावेश या कथेमध्ये आहे.
यशवंत मनोहर यांचे ‘प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे‘ हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे. व्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे.
Share
