Set Of 4 : Savarkar + Manoj Bajpeyi+ Karl Marx+Fidel Castro | By Ashok Kumar Pandey + Piyush Pande+Meena Shete-Sambhu+ Pranit Pravin Pawar
Set Of 4 : Savarkar + Manoj Bajpeyi+ Karl Marx+Fidel Castro | By Ashok Kumar Pandey + Piyush Pande+Meena Shete-Sambhu+ Pranit Pravin Pawar
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे एका सावरकरांपासून दुसऱ्या सावरकरांपर्यंत झालेल्या प्रवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. यात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी लेखकानं सावरकरांनी लिहिलेल्या विपुल लेखनाचा अभ्यास केला आहेच, शिवाय त्यांच्याविषयीच्या बहुतेक सगळ्या पुस्तकांचं, तत्कालीन ऐतिहासिक स्रोतांचं, समकालीनांकडून, ब्रिटिश सरकारकडून सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांचं गाढं अध्ययन केलं आहे.
प्रत्येकासाठी नायक झालेला ‘फॅमिली मॅन’ !
मनोज बाजपेयी यांच्याविषयी खूप काही लिहिलं गेलं आहे; पण या मुरलेल्या
कलाकाराच्या आयुष्याचे अनेक पैलू आजही अपरिचित आहेत. कुणीही गॉडफादर नसताना
या कलाकारानं बॉलिवूडमध्ये केवळ स्वतःचं स्थानच निर्माण केलं नाही, तर आपल्या
अभिनयाच्या जोरावर चित्रपट समीक्षकांना आपलं श्रेष्ठत्व मान्य करायला भाग पाडलं. मनोज
बाजपेयी आज स्वतःच अभिनयाची कार्यशाळा झाले आहेत. खास त्यांना पाहण्यासाठी
प्रेक्षकांची पावलं चित्रपटगृहांकडे वळू लागली आहेत. ‘मनोज बाजपेयी’ ही त्यांच्या
वडलांच्या गावाची बेलवाची मुख्य ओळख झाली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर या
चित्रपटातील त्यांच्या देशी रूपानं एक इतिहास घडवला आहे; तर सत्या, राजनीती आणि
अलीगढ अशा चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर
नेऊन ठेवलं आहे.
Meena Shete-Sambhu (कार्ल मार्क्स)
सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅस्ट्रो !
६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅस्ट्रो !
“क्रांती म्हणजे गुलाबाचा बिछाना नाही तर भुतकाळ आणि भविष्यकाळाच्या दरम्या न होणारं तुंबळ युद्ध आहे”, हे वाक्य गेल्या शतकातील सर्वोच्च क्रांतीकारी फिडेल कॅस्ट्रो यांचं.