Set Of 4 : Samruddha Palkatva + Sangopan Tanhulyache+ Tejasvi Mool Ghadtana+ Aaichi Denagi Vanshvel | By Navnath Jagtap, Aarti Jagtap+ Dr. Arun Mande+ Priti Pathak+G. N. Dandekar+ Dr. Malati Karvarkar
Set Of 4 : Samruddha Palkatva + Sangopan Tanhulyache+ Tejasvi Mool Ghadtana+ Aaichi Denagi Vanshvel | By Navnath Jagtap, Aarti Jagtap+ Dr. Arun Mande+ Priti Pathak+G. N. Dandekar+ Dr. Malati Karvarkar
Couldn't load pickup availability
आहे. आपल्या मुलांच्या विचारसरणी,स्वभाव आणि यशस्वी जीवनासाठीची पायाभरणी पालकत्वावर अवलंबून असते.योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार पालकत्व आपल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकते.
या पुस्तकात तुम्हाला मिळतील खालील प्रश्नांची उत्तरे:
1. पालकत्वात समृद्धता आणण्यासाठी कोणते मूलभूत तत्त्व आवश्यक आहेत?
2. मुलांचा स्वभाव,सवयी आणि वर्तन कसे समजून घ्यावे?
3. मुलांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना कशी निर्माण करावी?
4. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सकारात्मक पालकत्व कसे निभवावे?
5. संवाद कौशल्याने मुलांसोबतचा भावनिक संबंध कसा सुधारावा?
6. मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कसे प्रोत्साहन द्यावे?
7. मुलांमध्ये चांगल्या सवयी कशा रुजवाव्यात?
8. पालक आणि मुलांमधील दुरावा कसा कमी करावा?
9. अभ्यास,खेळ आणि जीवन कौशल्यांचा समतोल कसा साधावा?
10. पालकत्वातील आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने कसा करावा?
माझ्या तान्हुल्याची निरोगी वाढ कशी होईल, हीच एक काळजी प्रत्येक सुजाण मातेच्या मनाचा कोपरान् कोपरा व्यापून राहते. आपल्या बाळाची वाढ कशी राखावी, कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात इत्यादींबाबत सोपी शास्त्रीय माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या वर्षातली प्रत्येक टप्प्यावर होणारी आपल्या बाळाची वाढ आरोग्यसंपन्न व्हावी, बाळ सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी सोप्या, साध्या, सरळ भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक.
प्रीती पाठक यांनी मार्केटिंगमध्ये व्यवस्थापनाची पदवी संपादन केली आहे. दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचं कार्यक्षेत्र निवडलं. सध्या त्या एक उद्योजिका, लेखिका आणि इमोशन्स फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मार्गदर्शनातून, पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांना समृद्ध, सक्षम करत आहेत. यशदायी आनंदाचा मार्ग कसा निवडायचा, याचा मंत्र त्यांच्या पुस्तकातून वाचकाला सापडतो.
आजची नवी पिढी बुध्दिमान आहे. जिज्ञासू आहे. विविध माध्यमांमधून त्यांना माहितीचे प्रचंड साठे उपलब्ध होत असतात. विज्ञान, तंत्रज्ञान हा त्यांच्या जीवनाचा अभिन्न भाग आहे. पण माणूस म्हणूनही ती उत्तम घडायला हवीत. गुणसंपन्न व्हायला हवीत. सहृदय व्हायला हवीत. त्यांना कर्तव्यांची जाणीव असायला हवी. ह्या ‘माणूसपणा’साठी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत. प्रख्यात लेखक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ह्यांनी ‘आईची देणगी’ मध्ये सुबोध आणि रसाळ कथांच्या माध्यमातून हे काम फार प्रभावीपणे केले आहे.
आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे सर्वाधिक खपाचे पुस्तक!
बाळाचा जन्म आणि त्याचे संगोपन हा स्त्रीच्या आयुष्यातील आव्हानत्मक भाग असतो. हे आव्हान सोपे व्हावे, यासाठी डॉ. मालती कारवारकर या पुस्तकातून मर्गदर्शन करतात. उत्तम संततीसाठी गर्भवतीचा आहार कसा असावा, वजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत काळजी कशी घ्यावी, गर्भधारणा आणि निसर्ग यांचा संबंध काय आदी विषयांवर लेखीकेने सुयोग्य उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.
Share
