Set Of 4 : Ratan Tata Ek Deepstambh + Ratnankit Parv + Asahi Ek Kimayagar | By Shantanu Naidu+ Sandhya Ranade+Anjali Thakur
Set Of 4 : Ratan Tata Ek Deepstambh + Ratnankit Parv + Asahi Ek Kimayagar | By Shantanu Naidu+ Sandhya Ranade+Anjali Thakur
Couldn't load pickup availability
शंतनू नायडू हा विशीतला तरुण, 2014 साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. त्याने प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. ‘
भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारं रतन टाटा यांनी आयुष्यात माणसं आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळेच! व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृद्धीचा ध्यास, या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जमतं. त्यातून ते एक 'परफेक्शनिस्ट' हे विशेषण सहजपणे लावता येईल, असे व्यावसायिक बनले. एक बलाढ्य उद्योगपती म्हणून वारूपाला आले.
हे पुस्तक वाचल्यावर अनेक तरुणांना यातून प्रोत्साहन मिळेल, काहीतरी 'हटके' करण्याची प्रेरणा मिळेल आणि 'कुठलेही काम तुच्छ किंवा हलके नसते' , 'काहीही केले तरी ते नक्की यशस्वी करता येते' हा मंत्र मिळेल.
Share
