Set Of 4 : Maza Dhangarwada + Vinchwacha Tel + Sulkata + Keval Manavtesathi | By Dhananjay Dhurgude+ Prashant Rupvate+L. S. Jadhav+Tehmina Durrani
Set Of 4 : Maza Dhangarwada + Vinchwacha Tel + Sulkata + Keval Manavtesathi | By Dhananjay Dhurgude+ Prashant Rupvate+L. S. Jadhav+Tehmina Durrani
Couldn't load pickup availability
प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली.
Share
