Skip to product information
1 of 4

Set Of 4 :Gautam Adan + Dinakararao Jawalkar+ Dhirubhaism+ Keshavrao Jedhe Charitra | By R N Bhaskar+Dr. Y. D. Fadke+A. G. Krishnamurthy+Y D Phadke

Set Of 4 :Gautam Adan + Dinakararao Jawalkar+ Dhirubhaism+ Keshavrao Jedhe Charitra | By R N Bhaskar+Dr. Y. D. Fadke+A. G. Krishnamurthy+Y D Phadke

Regular price Rs. 780.00
Regular price Rs. 1,040.00 Sale price Rs. 780.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

गौतम अदानी या नावाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. बंदरं, शाश्वत ऊर्जा. विमानतळ, शहर गॅस वितरण, ऊर्जेचे ट्रान्समिशन, औष्णिक ऊर्जा, खाद्य तेल, सिमेंट, रेल्वे असा प्रचंड विस्तार असलेल्या एका महाकाय उद्योगसमूहाच्या ते प्रमुखपदी आहेत. अदानी समूह आता लवकरच टेलिकम्युनिकेशन्स, डेटा केंद्र, तांबं, अॅल्युमिनियम आणि स्टील यांच्या निर्मितीमध्ये उतरणार आहे. सध्या आशियामध्ये ते सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारे आहेत आणि जगातल्या पहिल्या पाच मूल्य-निर्मात्यांमध्ये अदानींचा समावेश होतो.  

जवळकरांच्या लेखनात एक अंगभूत उत्छृंखलपणा आणि बेफिकिरी आढळते. त्याचे फायदे व तोटे त्यांनी भोगले. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना ते वयाने फारच तरुण होते. कदाचित हा त्याचाही परिणाम असेल. वि. रा. शिंदेंसारख्या विचारवंतांकडून ज्या प्रकारच्या तात्त्विक मांडणीची आपण अपेक्षा करतो तशी जवळकरांकडून करूही नये. पण याचा अर्थ जवळकरांकडे वैचारिकता नव्हती असा मात्र कोणी करू नये. त्यांच्या भाषेने त्यांच्या वैचारिकतेवर नेहमीच मात केल्यामुळे ती सहजासहजी दृग्गोचर होत नाही एवढेच. 

गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं विद्यापीठ होते. त्यांनी स्वत:चं असं एक कार्यविषयक तत्त्वज्ञान व संस्कृती जोपासली होती. भव्य स्वप्नं, खडतर परिश्रमांची तयारी, निश्चयाचं बळ यांच्या जोडीला त्यांनी काही साधी-सोपी तत्त्वं अनुसरली होती. अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं. 

Keshavrao Jedhe Charitra (केशवराव जेधे चरित्र)

 

View full details