Skip to product information
1 of 4

Set Of 4: DIARY OF A HOME MINISTER + Narendra Modi Navi Bhajapa Badalta Bharat+Sawarkar Te Bhajapa Hindutvavicharacha Chikitsak Aalekh + Rajkaranatil giant killer By S H Deshpande + Mahesh Dattatray Talepatil + ANIL DESHMUKH

Set Of 4: DIARY OF A HOME MINISTER + Narendra Modi Navi Bhajapa Badalta Bharat+Sawarkar Te Bhajapa Hindutvavicharacha Chikitsak Aalekh + Rajkaranatil giant killer By S H Deshpande + Mahesh Dattatray Talepatil + ANIL DESHMUKH

Regular price Rs. 1,200.00
Regular price Rs. 1,599.00 Sale price Rs. 1,200.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

डायरी ऑफ ए होम मिनिस्टर

"समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन...

नरेंद्र दामोदरदास मोदी. सलग २० वर्षे सत्तेत असणारा लोकप्रिय नेता, टोकाची प्रशंसा व तीव्र टीकेचा धनी! ‘ग्रेट डिव्हायडर’ अशी एकीकडे ओळख असणार्‍या या नेत्याने दुसरीकडे आधी भाजपाची कार्यसंस्कृती बदलली आणि प्रशासनाचीही! यशस्वी लसीकरण करून कोरोना महासंकटातही ‘काम करणारी लोकशाही’ अशी भारताची नवी ओळख जगाला करून दिली, सरकारी योजना गरिबांच्या घरात थेट पोहोचवून आळशी लोकशाही कार्यान्वित केली, कणखर परराष्ट्रधोरणातून शत्रुराष्ट्रात धाक निर्माण केला, धाडसी निर्णय घेत अर्थव्यवस्था ‘फॉर्मल’ केली आणि भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला अग्रस्थान देत ‘सार्वभौम, हिंदू प्रजासत्ताका’च्या दिशेने वाटचाल सुरू केली.. 

'संघाची हिंदुत्व-संकल्पना व सावरकर-आंबेडकर यांचा समाजविचार ह्यांची जोड जमली आणि संघाच्या ‘हिंदु संस्कृती’चा आशय पूर्णपणे धर्ममुक्त झाला; तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल, अशी शक्यता आहे. ह्या प्रक्रियेला हातभार लावणे हा ह्या पुस्तकाचा विनम्र उद्देश आहे. '

View full details