Set Of 3 Shivchatrapatinche Armar +Shivrayancha Chhava +Shivcharitra Chhatrapati Shivaji Mahara| By Gajanan Bhaskar Mehendale+Aditya Nighot+Krushnarav Arjun Keluskar
Set Of 3 Shivchatrapatinche Armar +Shivrayancha Chhava +Shivcharitra Chhatrapati Shivaji Mahara| By Gajanan Bhaskar Mehendale+Aditya Nighot+Krushnarav Arjun Keluskar
Couldn't load pickup availability
शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. आपल्या 'हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.
कट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते. परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती?
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.
Share
