Set Of 3 Samrat Ashok Charitra + Gautam Budhhanche Charitra+ Mazi Atmakatha+Mahatma Jyotiba Phule | By V. G. Apte + Krushnarav Arjun Keluskar + Babasaheb Ambedkar
Set Of 3 Samrat Ashok Charitra + Gautam Budhhanche Charitra+ Mazi Atmakatha+Mahatma Jyotiba Phule | By V. G. Apte + Krushnarav Arjun Keluskar + Babasaheb Ambedkar
Couldn't load pickup availability
चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये अगदी शिर्ष स्थानावर आहेत. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान सम्राट म्हणून स्थान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणात गीतम
बुद्धांविषयी श्रद्धा निर्माण करणारे गौतम बुद्ध चरित्र…
बुद्ध हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि समासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते.
जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ साली झाला, जोतीरावांचे शिक्षण पुणे शहरातील शाळेत झाले. ती शाळा स्कॉटिश मिशनरी चालवत असत. या शाळेत ते इतर जातीच्या मुलांमध्ये मिसळत असत. त्यात अस्पृश्य जातींची मुलेही असत. तरुण वयातच त्यांनी अहमदनगर येथे अमेरिकन मिशनऱ्यांनी चालवलेल्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती आणि तिने ते अतिशय प्रभावित झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ऐन विशीत असतानाच त्यांनी कनिष्ठ जातीच्या मुलींकरता शाळा काढण्याची प्रेरणा घेतली. नंतर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या.