Set Of 3 Pratibhasurya Ravindranath Tagore+Chanakyaniti Chanakyasutransahit+Sudha Murthy+Maza Talamay Jeevan | By Pradeep Kulkarni+Prashant Kulkarni +Nasreen Munni Kabir
Set Of 3 Pratibhasurya Ravindranath Tagore+Chanakyaniti Chanakyasutransahit+Sudha Murthy+Maza Talamay Jeevan | By Pradeep Kulkarni+Prashant Kulkarni +Nasreen Munni Kabir
Couldn't load pickup availability
रवींद्रनाथ टागोर यांचे चरित्र आणि साहित्य याबद्दल आजही जगभरातील लोकांमध्ये अमाप कुतूहल आहे. त्याच कुतूहलातून अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून डॉ. विलास खोले आणि प्रदीप कुलकर्णी यांनी मराठीमध्ये लिहिलेले ‘प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर’ हे पुस्तक. थोर प्रतिभावंत, कवी, लेखक, शिक्षक, कलाकार, चित्रकार, समाजसेवक इत्यादी गुणांनी संपन्न आणि मानवतावादी अशा रवींद्रनाथ टागोर यांचे समग्र चरित्र.
विष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले आर्य चाणक्य यांनी आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे.
ज्या क्षेत्रात यापूर्वी एकाही स्त्रीने प्रवेश केला नव्हता, त्या अभियांत्रिकी क्षेत्रात जाऊन यशस्वी वाटचाल करणे. पुढे एक मोठा उद्योगसमूह उभा करणे. स्वतःची प्रगती करत असतानाच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने अनेक सामाजिक कार्यांसाठी वाहून घेणे. गरीब व पीडितांचे अश्रू पुसणे. आणि या सामाजिक कार्याचा वसा चालवत असतानाच आपल्या अनुभवविश्वातून दर्जेदार साहित्य निर्माण करणे; अशाप्रकारे विविधांगी कामांमुळे सुधा मूर्ती या तमाम भारतीयांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी लक्षवेधी ठरल्या आहेत.