Set Of 3 : Lise Mainter + Dr Maria Montessori + Golda Ek Ashant Vadal | By Veena Gavankar
Set Of 3 : Lise Mainter + Dr Maria Montessori + Golda Ek Ashant Vadal | By Veena Gavankar
Couldn't load pickup availability
कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं वाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुध्दा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, टी विसाव्या शतकातली थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...
एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते, किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते। त्या साठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते। किबुत्झमध्ये राहून कुक्कुट पालनाचे धडे घेते, प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुऊन घरखर्च भागवते। राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने प्रेरित होऊन, राजकारणात प्रवेश करते। अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते, इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री। वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते। आंतराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते। प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते। स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ – अर्थात ‘गोल्डा मेयर’