Skip to product information
1 of 3

Set Of 3 Chhava +Sambhaji +Rashtraveer Chhatrapati Sambhajiraje By Shivaji Sawant+Dr. Pramod Bankhele +Vishwas Patil |छावा +संभाजी +राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे

Set Of 3 Chhava +Sambhaji +Rashtraveer Chhatrapati Sambhajiraje By Shivaji Sawant+Dr. Pramod Bankhele +Vishwas Patil |छावा +संभाजी +राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे

Regular price Rs. 1,444.00
Regular price Rs. 1,850.00 Sale price Rs. 1,444.00
22% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

छावा 
‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते.

संभाजी 
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!

राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे
राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य." हा महामंत्र छातीशी कवटाळून संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हातात घेतली. महत्वाच्या पदांवरच्या स्वकीयांची फितुरी, प्रचंड सेनासागर घेऊन संबंध दक्षिणेचा घास घ्यायला दख्खनेत उतरलेला आलमगीर औरंगजेब, पोर्तुगेज- सिद्दी अश्या जगाच्या पाठीवर नानावलेल्या आरमारी सत्तांशी एकाच वेळी सुरु असलेला निर्णायक संघर्ष, ब्रिटिशांचं कावेबाज राजकारण या सगळ्या एकाच वेळी चालून आलेल्या वादळांना संभाजी महाराजांनी एकहाती जबरदस्त टक्कर दिली. औरंगजेबाची धडक एवढी प्रचंड होती की त्या धडकेत दक्षिणेत कित्त्येक वर्षांपासून घट्ट मुळं रोवून थांबलेल्या आदिलशाही आणि कुतुबशाहीसारख्या मातब्बर शाह्याही पत्त्यासारख्या ढासळल्या. याउलट तुलनेनं अतिशय तरुण असलेलं 'शिवछत्रपतींचं स्वराज्य' मात्र संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली फक्त स्वःसंरक्षणार्थ नाही तर 'दक्षिणेची पादशाही दक्षणियाच्या हाती' राहावी या शिवछत्रपतींच्या राष्ट्रवादी दूरदृष्टीपायी संबंध दक्षिणेचा कैवार घेऊन निर्वाणीचा लढा देत होतं. हा लढा एवढा चिवट होता की आशिया खंडातल्या सर्वात शक्तिशाली राजाला, औरंगजेबाला स्वतःच्या डोक्यावरची पगडी रागाच्या भरात जमिनीवर फेकावी लागली.

View full details