Set Of 3 Chatrapati Mhane +Shivchatrapatinche Armar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Prathamesh Subhash Rane+Gajanan Bhaskar Mehendale+Krushnarav Arjun Keluskar
Set Of 3 Chatrapati Mhane +Shivchatrapatinche Armar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Prathamesh Subhash Rane+Gajanan Bhaskar Mehendale+Krushnarav Arjun Keluskar
Couldn't load pickup availability
सर्वगुणसंपन्न अशी श्रीमंती हवी असेल, तर छत्रपती शिवरायांची जागा ही राजकारण्यांच्या व्यासपीठावर नाही; तर या अखंड हिंदुस्थानात नि विशेषतः महाराष्ट्राच्या घराघरांतील ‘स्टडी टेबल’वर निश्चित करायला हवी. लक्षात घ्या.. भूतकाळात कोणी काय लिहीलं, ते चांगलं की वाईट, ठोस की वादग्रस्त इत्यादि गोष्टींसाठी इतिहासकार बसले आहेत.
शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. आपल्या 'हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.